दगड खाण पोखरून गारगोटीची तस्करी;[मेंढवण मधून पुण्याच्या दलालामार्फत चीनपर्यत विक्री]




संगमनेर (प्रतिनिधी)
माफियांकडून रात्रीच्या वेळी महसूल विभागाच्या गौण खनिज अधिनियमाचे उल्लंघन करून गारगोटीची तस्करी होत असल्याची संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र महसूल विभागाचे आणि पोलिसांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.
गावातील काही जणांचाही यात अप्रत्यक्ष सहभाग असून. हे दगड पुणे,सिन्नर नाशिक मार्गे इतर राज्यांसह चीनपर्यंतही विकले जातात.तसेच काही व्यापारीही जिल्ह्यात येत असल्याची चर्चा आहे पोलिस मात्र  याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पोलिस छापा मारेपर्यत रातोरात हे तस्कर गारगोट्या घेवून फरार होतात प्राप्त माहितीनुसार मेंढवण येथील मोठेबाबा दर्गाह जवळ कौठे कमळेश्वर रस्त्यावर एक दगड खाण आहे आणि याच खाणीत हे  ‌कोटी रुपयाची दगड उत्खननात लागले आहेत.मात्र पोलिस आणि महसूल विभाग पथकाच्या नजरेतून हि कोट्यवधी रुपयांची गारगोटी निसटत आहे.त्यामुळे संगमनेरच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गारगोटीची तस्करी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. याआधी काही वर्षा वर्षापूर्वी निळवंडे बोगद्याचे काम सुरू असताना तेथील करोडो रुपयांची गारगोटी सिन्नरच्या व्यापाऱ्यांने लंपास केल्या होत्या साकूर येथे काही वर्षापुर्वी तस्करांचा सुळसुळाट झाला होता.आता मेंढवणच्या या खाणीतील गारगोटी साठी दोन गटात धुमश्चक्री होऊन रक्तपात होण्याची दाट शक्यता आहे ग्रामीण भागांमध्ये किंवा डोंगराच्या कुशीत तीस-चाळीस फूट खोदलं की आकर्षक गारगोटी लागतात.दगडाच्या दर्जानुसार,या गारगोटींची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते.त्यामुळे अशा प्रकारच्या दगडांची चोरी या परिसरात मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याची विक्री परराज्यात तसेच थेट चीनपर्यंतही होते,अशी चर्चा होताना  दिसते.

तालुक्यातील  काही भागांमध्ये विशेषतः डोंगरी भागात तीस ते चाळीस फूट खोदल्यावर असा दगड सापडतो.हिरवट,काळपट रंगाचा हा दगड अत्यंत मोलाचा आहे.दगडातील मिळणाऱ्या गारगोटीतून घराच्या भिंती,किंवा सजावटीसाठी खूप मागणी असते.महसूल विभागाकडून या दगडाच्या उत्खननाची परवानगी नाही.परंतु काही जण पोलीस, महसूल विभागाची नजर चुकवून याचे उत्खनन करीत असतात. दगडाच्या दर्जानुसार त्याला ४० हजारांपासून १ लाख रुपये टनांपर्यंतचा भाव मिळतो. शेतातली पिकं निघाली की तालुक्यातील विविध भागांतील डोंगरांतून गारगोटीचे उत्खनन सुरु होते.गारगोटीची तस्करी करून तिची विक्री पुणे नाशिक मार्गे पार चीनपर्यंत केली जाते, असे  बोलले जाते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!