पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 6 फेब्रुवारी रोजी “बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर तत्त्वज्ञान, इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये जवळपास 87 विद्यार्थी व विद्यार्थिनीनी मोठा सहभाग नोंदवला.
याप्रसंगी व्यंकटेश एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडचे CEO डॉ.भारत करडक यांचे “बौद्धिक संपदा अधिकार व त्याची कायदेशीर मार्गदर्शन” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणतेही संशोधन करताना किंवा कोणत्याही लेखी वाङ्मयाचा वापर करताना किंवा अनुकरण करतांना कोणकोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच व्यापार करताना प्रत्येक गोष्टीची पेटंट घ्यावे लागते व या पेटंट घेण्याची प्रक्रिया त्यात असलेली नियम व अटी यात जर एखाद्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी असलेली शिक्षा याच्या सर्व कायदेशीर बाजू त्यांनी मांडल्या.या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे , कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार , उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे ,उपप्राचार्य डॉ.अनिल वाबळे, उपप्राचार्या प्रा.छाया गलांडे यांचे या कार्यशाळेसाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास अधिकारी व तत्त्वज्ञान विभागप्रमुख प्रा.मनोज पाटील व इतिहास विभाग प्रमुख डॉ.अशोक बिडकर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अंकुश सूर्यवंशी तसेच प्रा.संदीप राजभोज प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण प्रा.लक्ष्मण घोटेकर डॉ.राजेंद्र पवार यांनी ही कार्यशाळा घेण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ. संगीता वाकोळे यांनी केले तर आभार डॉ.बिडगर यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.
0 Comments