लोहगाव ( प्रतिनिधी) कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी. यासाठी एका सर्वसामान्य शेतकऱ्यांने अनेक निवेदन पाठवली. पण त्याचा काही उपयोग न झाल्यानंतर आमरण उपोषण सुरू केले. मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. मात्र भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे यांनी दखल घेऊन या शेतकऱ्यांचे उपोषण सोडवले. सलग पाच दिवसांनी हे उपोषण सुटले असले तरी सर्व शेतकऱ्यांचा हा प्रश्न मोठा गहन आहे व तो सुटणे गरजेचे आहे. तो जर सुटला नाही तर राज्यात, देशात जन आंदोलन उभारू! असा इशाराही विनोद नाटे यांनी यावेळी दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शेतकऱ्याचा कष्टाने कांदा पिकाला, मुलीचे लग्न करायचे ,शेतीसाठी केलेले कर्ज फेडायचे ,रात्रंदिवस मेहनत केली. मशागतीसाठी कर्ज घेतले. ते फेडायचे हा सर्व विचार करत असतानाच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केली आणि भाव कोसळले. शेतकऱ्याला धक्का बसला. शेतकरी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात रोज तीन दिवस जाऊन बसला. परंतु भेट झाली नाही .शेवटी टपाल मध्ये निवेदन देऊन परत अहमदनगर जिल्ह्यात त्याच्या घरी परतला. सदर निवेदनामध्ये एक महिन्याचा अवधी सरकारला दिला. तुम्ही जर कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही तर मी आमरण उपोषण करणार ,असे स्पष्ट निवेदनामध्ये लिहिले असतानाही एक महिना झाला तरी सरकारकडून त्यांची मनधरणी करायला काय कोणी आलं नाही शेवटी उपोषणाची तारीख उजाडली आणि शेतकरी उपोषण करण्यासाठी बसला. पाच दिवस अन्नपाण्याचा त्याग करून शेतकरी तळमळत होता. परंतु शासकीय एकही अधिकारी त्याच्याकडे फिरकला सुद्धा नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणालाही जाऊन त्यांची मनधरणी करावी असं वाटलं नाही .कोणीही त्याच्याकडे गेले नाही की बाबा तू पाच दिवस झाले इथे तंबू ठोकून उपोषण करतोय, तुझं कारण आम्ही सरकारकडे मांडतो .उपोषण सोड! तुझ्या मागण्या नक्कीच मान्य होतील, असं कोणालाही नुसतं वाटलं सुद्धा नाही. त्यानंतर सदर शेतकऱ्याने भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाटे यांच्याशी संपर्क केला. विनोद नाटे यांनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये संपर्क करून सदर शेतकऱ्याची मन भरणी करून त्यांचे उपोषण सोडवा, अशी विनवणी केली. तरी देखील कुठलाही अधिकारी न फिरल्यामुळे भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे यांनी सदर शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल करून त्याची समजूत काढली आणि गावातीलच एका वारकऱ्याला त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडवायला सांगितले आणि त्यांनी त्यांना शब्द दिला की केंद्र सरकारने निर्यात बंदी शेतमालावर करू नये यासाठी आपण लवकरच राज्यसह देशात जन आंदोलन उभे करू! मी स्वतः पुढाकार घेईल तेव्हा शेतकऱ्याला बरं वाटलं आणि त्यांनी उपोषण सोडण्याची तयारी दाखवली. कारण सदर शेतकरी हा भूमिपुत्र फाउंडेशनचे शेतकऱ्यांसाठी जन जागृतीचे आंदोलन व त्यांचे व्हिडिओ नेहमी बघत असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि फोनवरच उपोषण सोडले. मात्र या शेतकऱ्याची सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा कोणीही बाजू घेतली नाही. विनोद नाटे यांनी त्यांना पाठिंबा देत आधार दिला व त्यानंतर त्यांनी पाच दिवसानंतर उपोषण सोडले. मात्र विनोद नाटे यांनी यापुढे तीव्र जन आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला आहे.
0 Comments