सावळीविहीर बु.येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटात नुकसान झालेल्या रणधीर कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून तातडीने मदत!या पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी-- या कुटुंबासह ग्रामस्थांचीही मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील
 सावळीविहीर बुद्रुक येथे सोपान सयाजी रणधीर यांच्या राहत्या घरामध्ये तीन दिवसांपूर्वी गॅस सिलेंडर लीक होवून अचानक गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्यामुळे घरातील सर्व सामान जळून खाक झाले व त्यांची सून सपना सिद्धार्थ रणधीर व नातू गौरव सिद्धार्थ रणधीर हे जखमी झाले असून त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यामुळे सर्वत्र मोठे दुःख व्यक्त होत आहे. या परिवाराला तातडीने सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतच्या माध्यमातून जीवनाशक वस्तू व किराणा, भांडे, भाजीपाला तसेच कपडे चटई, रग ,कुकर आदी वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जखमी साठी ही वेगवेगळ्या प्रकाराने मदत करण्यात येत आहे. याप्रसंगी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी या कुटुंबाच्या अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव दुखी झाले असून या कुटुंबाला गावाच्या, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापुढेही पाहिजे ती मदत केली जाईल तसेच शासकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.या कुटुंबाला नक्कीच ग्रामपंचायत व गावाच्या माध्यमातून आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत. असे सांगितले .यावेळी ग्रामविकास अधिकारी रावसाहेब कार्ले ,राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, पोलीस पाटील संगीता सुरेश वाघमारे ,गणेश कापसे, माजी सरपंच सोपानराव पवार, शरद गडकरी ,विनायक वाघमारे, सुरेश वाघमारे, कैलास पळसे, एकनाथ आरणे, बबनराव आरणे, मुकेश वाघमारे, नाना पवार आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी , ग्रामस्थ तसेच पीडित कुटुंबातील सोपान सयाजी रणधीर व त्यांच्या पत्नी ,आदी उपस्थित होते. हे कुटुंब अगदी गरीब असून या दुर्दैवी घटनेने ते मोठे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी .अशी मागणी या कुटुंबाकडून व ग्रामस्थांकडूनही होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे