*मातृभाषेतूनच समृद्धी व संस्कृतीचे दर्शन- काकडे*


लोहगाव (वार्ताहर): आपल्या मातृभाषेतूनच सर्वांगीण प्रगती होते. मराठी भाषेला न विसरता ती हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा आहे. या मातृभाषेतूनच खरी समृद्धी व संस्कृतीचे दर्शन होते, असे प्रतिपादन प्राचार्य अंगद काकडे यांनी केले. 
      महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंगद काकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार कोंडीराम नेहे हे उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज आणि शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.शरद दुधाट यांनी केले. याप्रसंगी भारती कोठे, समीक्षा अनाप,  अमृता कारंडे व उपप्राचार्या अलका आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी दिपाली तुपे व समन्वयक डॉ.दुधाट यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व प्राचार्य अंगद काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कोंडीराम नेहे यांनी मराठी भाषेचे महत्व आणि ऋणानुबंध व्यक्त करून मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यावे हे विशद केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर हिरा चौधरी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे