आगामी मराठी चित्रपट लग्न कल्लोळ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतले साई दर्शन ! प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव व मयुरी देशमुख यांचाही साई संस्थानच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी)आगामी मराठी चित्रपट लग्‍न कल्‍लोळ या चित्रपटाच्‍या संपुर्ण कलाकार टीमने गुरुवारी  शिर्डीला भेट‌ देवून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव व मयुरी देशमुख यांनी श्री  साई चरणी लग्न कल्लोळ या चित्रपटाची पत्रिका  ठेवली.
आगामी मराठी चित्रपट लग्‍न कल्‍लोळ चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सत्‍कार करण्यात आला. मंदीर विभागाप्रमुख रमेश चौधरी, यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी  व  प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यावेळी उपस्थित होते.
या लग्‍न कल्‍लोळ चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव व अभिनेत्री मयुरी देशमुख यांचाही श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने त्यांचा शाल साई डायरी देत सत्कार करण्यात आला. लग्न कल्लोळ हा चित्रपट लोकांना आवडेल, तो अधिकाधिक चालावा यासाठी श्री साईबाबा चरणी आपण साकडे घातले असे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे