*कवडसे मुलाखत संग्रहाचे प्रकाशन*


कोल्हार :
      प्रतिकूलतेवर मात करून आपले वेगळे विश्व साकारणाऱ्या  विजिगीषु व्यक्तींची यशोगाथा मांडणारे पुस्तक अंजुषा संखे यांनी लिहिलेले पुस्तक शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक डॉ.आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4.15 वाजता ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ संपन्न होणार आहे. 
              एका दृष्टिबाधित लेखिकेने घडविलेले मनोज्ञ दर्शन या पुस्तकात वाचकांना होणार आहे. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक डॉ.संतोष लक्ष्मण राणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे