लक्ष्मीवाडी जि प प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा आज 12 मार्च रोजी सायंकाळी- सांज चिमणपाखरांची- हा सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन!

शिर्डी( प्रतिनिधी ) राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक  केंद्र शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही -सांज चिमणपाखरांची- हा सदाबहार असा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव, तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ  मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या राहणार असून शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,  गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे , सावळीविहीर बुद्रुकचे  सरपंच ओमेश साहेबराव जपे उपसरपंच विकास नानासाहेब जपे, राहता कृ. उ.बा. समितीचे संचालक शांताराम जपे, सरपंच महासंघाचे राज्यउपाध्यक्ष  बाळासाहेब जनार्दन जपे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी या लहान विद्यार्थ्यांच्या या सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ, कलाप्रेमीं यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा खांडगे, तसेच लक्ष्मीवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दीक्षित व उपाध्यक्ष विकास आगलावे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम बरेच वर्षानंतर होत असल्यामुळे पालकांमधून व विद्यार्थ्यांमधूनही मोठे समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे