राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रम सौ शालिनीताई विखे पा. यांच्या उपस्थितीत संपन्न!

बाभळेश्वर (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथे
 विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन जि. प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे हस्ते पार पडले.तसेच
 भाजपा जिल्हा व तालुका कार्यकारणी वर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आर आर  पाटील सुंदर गाव योजनेत बाभळेश्वर ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल सदस्य मंडळाचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बाभळेश्वर गावात आर आर पाटील सुंदर गाव योजनेत प्रथम पारितोषक मिळाल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत तिचे पदाधिकारी सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी,व ग्रामस्थांचे सौ शालिनीताई विखे यांनी अभिनंदन केले व यापुढे असेच कार्य ग्रामस्थांनी ,ग्रामपंचायत पदाधिकारींनी केले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले.
      यावेळी गावातील प्रमुख मान्यवर  सरपंच संगिता श्रीकांत शिंदे,उपसरपंच राहुल डहाळे
बाबासाहेब म्हस्के,उपसरपंच अमृत मोकाशी, उपसरपंच अजित बेंद्रे,डॉ वैशाली म्हस्के
निता कांदळकर,कविता म्हस्के
सुवर्णा मोकाशी,काकासाहेब म्हस्के,तुकाराम पा. बेंद्रे
दादासाहेब म्हस्के
दौलत बेंद्रे,भाऊसाहेब गोंडे
रविंद्र बेंद्रे,बाळासाहेब म्हस्के
शंकर पा बेंद्रे तसेच
उपअभियंता प.स.राहाता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे