परमपूज्य देऊडकर महाराजांच्या १०८ शिर्डी परिक्रमा संकल्पपुर्ती निमित्त पाच मार्च 2024 रोजी शिर्डी परिक्रमेचे आयोजन!शिर्डी परिसरातील साईभक्तांनी, महिलांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन!

शिर्डी( प्रतिनिधी) 
आदरणीय परमपूज्य देऊडकर महाराजांच्या 108 शिर्डी परिक्रमा संकल्प पूर्ती निमित्त पाच मार्च 2024 रोजी शिर्डी परिक्रमेचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले असून या शिर्डी परिक्रमेत शिर्डीसह परिसरातील साई भक्तांनी, ग्रामस्थांनी , महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डी परिक्रमा 13 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य प्रमाणात संपन्न झाली होती. त्यानंतर परत पाच मार्च रोजी ही शिर्डी परिक्रमा होत आहे. आदरणीय परमपूज्य देऊडकर महाराजांच्या 108 शिर्डी परिक्रमासंकल्प पुर्ती निमित्ताने ही शिर्डी परिक्रमा होत असून पुन्हा एकदा शिर्डी परिक्रमा व या परिक्रमा ऊर्जेची अनुभूती परिक्रमाधारकांना  त्यातून मिळणार आहे. 5 मार्च 2024 रोजी सकाळी सहा वाजता शिर्डीतील श्री खंडोबा मंदिरा पासून या शिर्डी परिक्रमेला सुरुवात होणार आहे. या कालावधीत जागतिक महिला दिन असल्याने सर्व महिलांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिर्डी परिक्रमा मार्गावर सडा, शिंपण, रांगोळ्या, स्वागत कमानी ,आदी राहणार आहेत. शिर्डी परिक्रमा मार्गात श्री सप्तशृंगी माता मंदिरात आदरणीय देऊडकर महाराजांचा परमपूज्य मंहत काशीकानंद महाराजांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात येणार आहे. शिर्डी परिक्रमा 108 संकल्प पूर्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार, सन्मान करून त्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. या शिर्डी परिक्रमेत शिर्डी व परिसरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहनही जितेंद्र शेळके, अरविंद महाराज, त्याचप्रमाणे ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे