युवा ग्रामीण पत्रकार संघाचा कोल्हारच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा





राहुरी / प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील कोल्हार बु येथे महसूल विभागाच्या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाने भेट देत आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे 
   कोल्हार बु येथील महार वतन जमीनीचे बेकायदा हस्तांतरण प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी शिस्तभंगाची कारवाई न करता बिल्डरला जमीनीची विल्हेवाट लावता यावी यासाठी आदेश पारित केल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक ४ मार्चपासून कामगार तलाठी कार्यालयासमोर नानासाहेब शंकर लोखंडे,  प्रसाद शशिकांत लोखंडे आपल्या माता भगिनी व कुटूंबासह उपोषणास बसले आहेत 
   यासंदर्भात युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष महेश भोसले, सचिव बाळकृष्ण भोसले, उपाध्यक्ष उमेश साठे, जिल्हा निमंत्रक राजेंद्र म्हसे, राहुरी तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, तालुका सचिव आर. आर. जाधव यांच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले प्रथमदर्शनी त्यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असल्याचे सांगत या उपोषणाला संघाचा पाठिंबा जाहीर केला        महसूल प्रशासनाने लक्ष देत उपोषणकर्त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास या मागण्या आणून देणार असून या प्रश्नी पत्रकार संघ आपल्याबरोबर असल्याचे प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे