श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार 25 मार्च रोजी होणार प्रस्थान!

शिर्डी (प्रतिनिधी) श्री रोकडेश्वर हनुमान महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने व समर्थ सद्गुरु श्री संत नारायणगिरी महाराज, यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शक हभप संजयजी महाराज जगताप, 
भऊरकर व सहमार्गदर्शक प्रमोद (दादा )मुरलीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण अशा पायी दिंडी सोहळाचे सोमवार दिनांक 25 मार्च 2024  ते सोमवार दि. एक एप्रिल 2024 या कालावधीत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी, वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हभप संजयजी महाराज जगताप व प्रमोद दादा जगताप यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून पैठण येथे श्री एकनाथ षष्ठी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीही 25 मार्च 2024 रोजी सकाळी दहा वाजता भऊर येथून श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरातून श्री सुधाकर मदनराव जगताप (मा सरपंच भऊर )यांच्या हस्ते विना पूजन करून व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी माता व श्री एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. पायी दिंडी सोहळ्याच्या विश्रांती व मुक्काम या ठिकाणी हरिपाठ कीर्तन प्रवचन तसेच दानशूर मंडळी कडून चहा नाश्ता जेवण आदी कार्यक्रम होणार आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता गोयेगाव भऊर येथील संगीतमय भारूडाचा कार्यक्रम होणार असून 31 मार्च रोजी सायंकाळी व सोमवार दिनांक एक एप्रिल 2024 रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत हभप संजयजी महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर प्रमोद( दादा) जगताप यांच्या मार्फत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या पायीदिंडीचा व सर्व कार्यक्रमाचा वारकरी, भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन हभप संजयजी महाराज जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे