शिर्डी( प्रतिनिधी ) क्रांतिकारी रामोशी, बेरड ,बेडर ,वाल्मिकी, तलवार समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते प्रयत्न आपण करू, असे आश्वासन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ना.सिद्धरामय्या यांनी दिले.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची क्रांतिकारी रामोशी बेरड बेडर वाल्मिकी तलवार या समाजाचे राष्ट्रीय नेते व नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण व कर्नाटक राज्याचे अध्यक्ष राजशेखर तलवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बेळगाव येथे प्रत्यक्ष भेट घेऊन समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली. नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष वसंतराव चव्हाण, कर्नाटकचे अध्यक्ष राजशेखर तलवार व युवा आघाडीचे अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बेळगावचे पालकमंत्री यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
या दिलखुलासपणे झालेल्या बैठकीत, कर्नाटक मध्ये बेरड आणि बेडर मध्ये असलेला फरक यामुळे समाजाची होणारी हानी याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातही क्रांतिकारी रामोशी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा. यासाठी आपणही प्रयत्न करावेत. अशी विनंती ही त्यांना यावेळी करण्यात आली व समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले.
तास दीड तास सविस्तर झालेल्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री ना. सिद्धरामय्या यांनी समाजाचे प्रश्न, समस्या समजून घेत या सर्व प्रश्ना संदर्भात आपण विशेष लक्ष घालून त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनीही बेरड व बेडर आणि रामोशी, तलवार, वाल्मिकी यांचा रोटी बेटी व्यवहार होत असताना मात्र यातील काही समाजाला सवलती मिळत नाहीत. त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करू असे सांगितले तर बेळगावचे पालकमंत्री व समाजाचे नेते ना. सतीश जारकीहोळी यांनीही समाजाच्या विविध समस्या संदर्भात आपण कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकारी व समाजाचे नेते यांना घेऊन दिल्लीमध्येही चर्चा करू व त्या सोडवण्यासाठी विशेष लक्ष घालून प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी वसंतराव चव्हाण व राजशेखर तलवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळाला यावेळी दिले. या शिष्टमंडळात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments