संगमनेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञातांकडुन जाळण्याने खळबळ उडाली आहे.
९ मार्च रोजी सकाळी येथील शिक्षक अर्जुन दातीर यांनी सकाळी शाळेचा वर्ग उघाडला असता त्यांना एका वर्गाचा दरवाजा जळालेल्या अवस्थेत दिसला तसेच शाळेचे कंपाऊंड आणि गेट तुटलेल्या अवस्थेत होते.शिक्षकांनी हि घटना तात्काळ गावातील नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्षे व उपाध्यक्ष सौ.कविता संपत भोसले यांना कळविली सदर घटनेची माहिती आश्वी पोलीस ठाण्याला कळविली असता पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे सह पथक घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ.ज्योती दिघे व सौ.अनुराधा कासार यांनीही दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले हि घटना सरपंच सौ.किरण गागरे यांना समजली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी शाळेच्या तुटलेल्या कंपाऊंड व गेटची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले व कामाला सुरुवात झाली तसेच यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येईल असे आश्वासन यावेळी सरपंचांनी त्यांनी दिले
सदर घटनेची खबर मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी आश्वी पोलिस ठाण्यास कळविली असता पोलिसांनी अज्ञाता विरोधात भारतीय दंड संहिता १८६८ कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments