राहुरी / प्रतिनिधी : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहु कानडे यांच्या प्रयत्नाने अखेर देवळाली प्रवरा ते चिंचोली या रस्त्याचे भाग्य उजळले ग्रामस्थांच्या जुन्या मागणीला प्रतिसाद देत ६ की.मी लांबीचे मजबूतीकरणा बरोबरच डांबरीकरण होणार आहे
प्रारंभी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी श्रीफळ वाढवून भुमिपुजन केले प्रसंगी आ. लहु कानडे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्रीरामपुर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी सभापती अरूण पा. नाईक, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी माऊली मुरकुटे, चिंचोलीचे माजी सरपंच गणेश हारदे, सर्जेराव लाटे, सुनिल लाटे, बाळासाहेब पारखे, विनोद चोखर, प्रतीक देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते
गत अनेक काळापासून चिंचोली फाटा ते राज्यमार्ग ३६, देवळाली रस्ता (इतर जिल्हा मार्ग ५३) हा रस्ता लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित राहिला होता अहमदनगर-मनमाड महामार्गावरून देवळाली प्रवरेकडे जाणारा हा जवळचा रस्ता अतिशय हाल अपेष्टा भोगत होता काही ठिकाणी अतिक्रमणाच्या विळख्यातही फक्त पाऊलवाटेसारखा भासणारा हा महत्वाचा रस्ता स्थानिक व बाहेरगाववरून येत असलेल्या प्रवाशांना धक्क्यावर धक्के देत त्रासदायक ठरला होता स्थानिकांनी अनेकवेळा मागणी करूनही मात्र या रस्त्याकडे दुर्लक्षच होत होते देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते मात्र नगरपालिका हद्दीबाहेर हा रस्ता अत्यंत निकृष्ठ झाला होता
अखेर आमदार लहु कानडे यांनी यात लक्ष घालून जवळपास सहा की. मी. रस्त्यासाठी जवळपास २२० लक्ष रूपये मंजूर करून भुमिपुजन केले व कामाला सुरूवातही होणार असल्याचे त्यांनी सांगितले
प्रसंगी चिंचोली व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
अनेक वर्षाची मागणी पुर्णत्वास आल्याने जनतेने आ. कानडेंना धन्यवाद दिले आहे
0 Comments