राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व सिध्दीविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!



मुरबाड  दि.११-(बाळासाहेब भालेराव )  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे *राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेतृत्व बिपीन  कटारे
 यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम व  योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी
 यांच्या सहकार्याने ठाणे  जिल्हा-शहर पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडी, 
ठाणे जिल्हा अध्यक्षा आरोग्य विभाग रंजना भांगे
 यांच्या वतीने  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व सिध्दीविनायक हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवतरुण मित्र मंडळ बौध्द विहार, भीमनगर ठाणे पश्चिम येथे "मोफत भव्य आरोग्य तपासणी" शिबीराचे आयोजन  करण्यात आले होते. 
         पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या शुभहस्ते विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन  नांगरे, मुंबई प्रदेश प्रभारी वसंत वाघमारे, कॉग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे, ठाणे जिल्हा शहराध्यक्ष साईनाथ खरात, उत्तर भारतीय युवा अध्यक्ष नारायण पांडे, ठाणे जिल्हा अध्यक्षा रंजना कदम, प्रकाश कदम, लोखंडे  सिध्दीविनायक हॉस्पिटल कर्मचारी वर्ग, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते
 आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात अनेक तपासण्या व उपचार संपूर्णपणे मोफत करण्यात आले होते. भीमनगर वर्तक नगर येथील ७० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सिध्दीविनायक हॉस्पिटलचे  डॉ अमोल गिते व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन  पक्षाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे