लोणी खुर्द येथे व्यापारी संकुलाचे उद्घाटन व ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन ना.विखे पा. व राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न!

लोहगाव (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे विकसित करण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि लोणी बुद्रुक येथे विकसित करण्यात येणाऱ्या ग्राम सचिवालयाचे भूमिपूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री ना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व  राज्याचे मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर,हभप उद्धवजी महाराज ,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील व जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे विकसित करण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आल्यामुळे येथे व्यापार वाढणार आहे, रोजगार  मिळणार आहे. आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे लोणी बुद्रुक येथे ग्रामसचिवालयाचेही भूमिपूजन महसूल मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीही राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या उपस्थित होत्या. लोणी बुद्रुक येथे ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे लवकरच येथे आधुनिक व अपडेट आणि जलद गतीने कामे होतील. स्वच्छ सुंदर व सर्व सोयीसुविधा असे हे ग्रामसचिवालय असणार आहे.या कार्यक्रमाला लोणी बुद्रुक व परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!