राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. येथील जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्याच्या त्रिशा फाउंडेशन कडून शालेय साहित्यांचे मोफत वाटप!

शिर्डी (प्रतिनिधी) आपण विविध ठिकाणी ,विविध कार्यक्रमांमधून मोठा खर्च करत असतो. विविध ठिकाणी विनाकारण पैसा खर्च करत असतो. मात्र या खर्चाला थोडा फाटा देऊन शाळा व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या शालेय वस्तू , वह्या, पुस्तके ,देऊन विद्यार्थ्यांना मदत केली. शाळा हेच ज्ञानमंदिरे समजून या ज्ञानमंदिरांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून आर्थिक मदत केली. तर नक्कीच भविष्यात या चिमुकल्या लहान पिढीला पुढे त्याचा फायदा होईल. तेव्हा प्रत्येक संस्था, ट्रस्ट, दानशूर व्यक्तींनी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. असे मत पुण्याच्या त्रिशा फाउंडेशनचे संस्थापक जयेश बेहेडे यांनी आपले मत व्यक्त केले.व  सर्व दानशूर व्यक्तींना तसे आवाहानही त्यांनी यावेळी केले.
     राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी त्रिशा फाउंडेशन पुणे यांनी या शाळेतील सर्व मुलांना स्कूल बॅग ,100 पाणी वहया,200 पेजेस स्कॉयर बुक, रायटिंग पॅड, पेन्सिल ,रंगखडू, आणि पाऊच,वाटप केले ,त्यावेळी त्रिशा फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती मिलन बेहेडे ,त्याचप्रमाणे संस्थापक जयेश बेहेडे उपस्थित होते . यावेळी त्या बोलत होत्या.
शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले .तसेच पुढील काळातही त्रिशा फाउंडेशन च्या वतीने आम्ही शाळेला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. शाळेचा परिसर, वृक्षे, रंगरंगोटी, तसेच शांतता व स्वच्छता आणि गुणवत्ता पाहून शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले. या शाळेचे मुख्याध्यापक दत्ता गायकवाड यांनी त्रिशा फाउंडेशनचे संस्थापक जयेश बेहेडे, एक्झिटिव्ह ऑफिसर श्रीमती मिलन बेहेडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक श्री दत्ता गायकवाड, श्रीमती रूपाली मंद्रे, श्रीमती सुचित्रा चवाळे ,श्रीमती विद्या गोर्डे ,श्रीमती सविता सानप,व या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे