आदिवासी महिला मेळावा व वीर एकलव्य जयंती सावळीविहीर खुर्द येथे उत्साहात संपन्न,----------------------------------------आदिवासी महिलांनीही समाज उन्नतीसाठी पुढे आले पाहिजे---- शिवाजीराव गांगुर्डे

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहिर खुर्द या ठिकाणी आदिवासी महिलांचा मेळावा व वीर एकलव्य जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 या मेळाव्यास आदिवासी समाजाचे  व वीर एकलव्य संघटनेचे नेते व आपले परखड व स्पष्ट विचार मांडणारे शिवाजीराजे गांगुर्डे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हा. चेअरमन व माजी सरपंच अशोकराव जमधडे पा. यांनी भूषवले. माजी सरपंच महेशराव जमधडे ,विद्यमान सरपंच अर्चनाताई क्षीरसागर, सुदाम मोरे ,माधव माळी ,सुरेश पवार वीर एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विलास पवार, सावळीविहिर बु ग्रामपंचायत सदस्य दिलीप गायकवाड, हनुमान माळी ,रोहिदास बर्डे, रंगनाथ आहेर ,बबनराव मोरे, वरझडीचे माजी सरपंच संदीप सोनवणे ,दशरथ माळी, हनुमान माळी, विकास माळी, महेश माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी समाजात बचत गटांचे किती महत्त्व आहे ,बचत कशी मार्गी लावावी ,यांविषयी मा. सरपंच अशोकराव जमधडे यांनी मार्गदर्शन केले. तर समाजात आदिवासी क्रांतिकारकांनी बलिदान दिले .त्याचे स्मरण देश वासियांनी केले पाहिजे. असे सांगत शासकीय योजनांची माहिती ,बचत गटांना मिळणारे  अनुदान  या विषयी माहिती, महिलांना त्यांचे हक्क आणि त्यांचा वापर याविषयी माहिती शिवाजीराव गांगुर्डे यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शन भाषणातून उपस्थितांना दिली . अंधश्रद्धा, व्यसन यापासून दूर राहून शिक्षण घेऊन शासनाच्या विविध योजना समजून घेऊन ,त्याचा लाभ घेऊन कुटुंबातील दारिद्य दूर कसे करता येईल . आपण ,आपले कुटुंब, आपले नातेवाईक ,आपला समाज हा कसा आर्थिक दृष्टीने प्रबळ होईल. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.हे समजावून सांगितले. शासनाच्या योजना व अनुदानाचा लाभ घेऊन त्याचा योग्य वापर केला पाहिजे . आता महिलांनीही पुढे आले पाहिजे. नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत आहेत .आदिवासी महिला भगिनींनी आता पुढे आले पाहिजे .असेही त्यांनी यावेळी या मेळाव्यात मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन समाजाचे युवा नेते विलास पवार यांनी केले. या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक , युवती,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे