मुरबाड दि.१३. (बाळासाहेब भालेराव) कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रायते पिंपळोली सरपंच पदी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या समिता सुरोशी यांची बिनविरोध निवड झाली
ग्रुप ग्रामपंचायत रायते -पिंपळोली या ग्रामपंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य आहेत, तत्कालीन सरपंच करिष्मा सुरोशी यांनी राजीनामा दिल्याने १३ मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली एकूण चार अर्ज दाखल करण्यात आले होते, माया सुरोशी, करिष्मा सुरोशी, वैशाली पवार व समिता सुरोशी असे चार अर्ज आले होते या पैकी तीन अर्ज माघार घेण्यात आले व समिता सुरोशी यांचा एकमेव अर्ज राहिल्याने शिवसेना महाविकास आघाडीच्या समिता सुरोशी यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली, उप सरपंच मयूर सुरोशी, निवडणूक अध्याशी अधिकारी पी. बी. हरड यांनी काम पाहिले ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.तसेच संपुर्ण निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गोधंळी हे लक्ष ठेवून होते व त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच समिता सुरोशी यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण तालूका प्रमुख विश्वनाथ जाधव,मुरबाड तालूका प्रमुख संतोष विशे माजी जि प सदस्य महेद्र जाधव उप जिल्हा युवा अधिकारी नितीन सुरोशी, जिल्हा युवा सेना समन्वयचे संतोष सुरोशी ,कल्याण पं समितीचे सदस्य रमेश बांगर,कल्याण तालूका संघटक नरेश सुरोशी, शाखा प्रमुख भास्कर टेंभे, रमेश सुरोशी, सदस्य मयूरी रोहणे, सुभाष जाधव,यतीन बुटेरे हरेश पवार माया सुरोशी, वैशाली पवार तसेच नामदेव बुटेरे, इत्यादी उपस्थित होते,
,
0 Comments