सावळीविहीर बुद्रुक या पंचक्रोशीतील मोठ्या गावाचे लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे पा.यांचा आज बुधवार 13 मार्च रोजी वाढदिवस असून तो विविध उपक्रमांनी साजरा होत आहे .असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन होत आहे. प्रत्यक्ष भेटून सत्कार होत आहेत. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे. सरपंच ओमेश साहेबराव जपे पा. यांना दैनिक छत्रपती एक्सप्रेस परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आहेत.
शिर्डी नजीक असणाऱ्या सावळीविहीर बुद्रुक या गावाचे लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे पा. हे सुमारे दोन वर्षांपूर्वी सरपंच झाले. तत्पूर्वी ते सावळीविहीर पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते व राहता पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम पाहिले होते. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.
नेहमी कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, गावातील कोणतीही शाळा,मग ती अंगणवाडी किंवा जिल्हा प्राथमिक शाळा असू द्या ,हायस्कूल असू द्या, तेथे कोणत्याही कार्यक्रम असो, वा तेथील शाळेच्या काही अडचणी, समस्या असो! त्या सोडवण्यासाठी त्यांचे नेहमी सहकार्य असते .शैक्षणिक कार्याअसो ,सांस्कृतिक कार्यक्रम असो ,किंवा गावातील यात्रा, साई चरित्र पारायण, सप्ताह, दिंड्या, आदी धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये त्यांचा नेहमी मोठा सहभाग असतो. राजकीय क्षेत्रातही राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. ,खा.डॉ. सुजय दादा विखे पा., व जि. प. मा.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठपणे काम करत असताना गावातील सहकारी नेते, मित्र ,ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, यांना बरोबर घेऊन गावातील प्रश्न, समस्या सोडवणे, गावात विविध योजना आणून ,उपक्रम राबवून गावाचा विकास साधण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेब जनार्दन जपे व ओमेश साहेबराव जपे यांनी जनसेवा व जनसेवा परिवर्तन मंडळ ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन समझोता एक्सप्रेस राबवून येथे गावाच्या विकासासाठी राजकीय हेवेदावे न करता एकत्रित येऊन तालुक्यात एक मोठा इतिहास घडवला. गेल्या दोन अडीच वर्षापासून सरपंच पदावरून काम करत असताना अनेक विकास कामे गावात केली. नुकतेच महिन्यापूर्वी गावात विविध विकास कामांचे उद्घाटनेही झाली. अशा सर्वच क्षेत्रामध्ये कमी वयात व कमी वेळेत उत्तुंग भरारी घेऊन आपली राजकीय कारकीर्द गावातच नाही तर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात नावारूपाला आणणारे व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणारे व कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात,व कुठेही जेवताना अन्न हे पूर्ण ब्रम्हाअन्न असून ते ताटात उष्टे टाकू नये, याची आणि सर्वत्र स्वच्छता राखण्याची, प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्याची प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमातून उपस्थितांना प्रतिज्ञा देणारे,व स्वतःही ते आचरणात आणणारे ओमेश साहेबराव जपे पाटील हे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्येही नेहमी आनंदी व हसतमुख असतात. वडील साहेबराव शंकरराव पा. जपे हे कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य होते .एक सुसंस्कृत व सुशिक्षित अभ्यासू असे राजकीय नेतृत्व असणाऱ्या वडिलांकडूनच राजकीय वारसा घरातूनच मिळाला. संपूर्ण परिवार सुशिक्षित, सुसंस्कृत व वडिलांचे मार्गदर्शन यामुळे ओमेशभांऊचे कार्य आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरू झाले. सुस्पष्ट बोलणे, परखड व सडेतोड, रोखठोक असे निर्णय घेणे . कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होणे. अडचणीला मदत करणे. असा त्यांचा स्वभाव व संघटन कौशल्य यामुळे त्यांचा गावातच नाही तर तालुक्यात जिल्ह्यात व राज्यातही मोठा मित्रपरिवार निर्माण झाला आहे. त्यांना सर्वजण ओमेश भाऊ म्हणतात. ते सर्वांचे भाऊ आहेत. भाऊ शब्द उलट केला तर ऊभा होतो. सर्वांच्या पाठीशी ऊभा राहणारा भाऊ! असं अनेक जण म्हणत असतात.
अशा ओमेश भाऊंना नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भवन येथे आदर्श सरपंच पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. राहाता पंचायत समितीचे उपसभापती असताना पंचायत समितीलाही त्या काळात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांची कल्पना, त्यांचे गावाच्या विकासासाठी असणारे व्हिजन व त्यासाठी होत असलेले प्रयत्न खरोखरच अभिनंदनही आहेत. हे सर्व करत असताना ते एक प्रगतीशील शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून ते एक मोठे व्यवसायिकही आहेत. आपला शेती व व्यवसाय सांभाळून राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक कार्याकडे लक्ष देणारे
सरपंच ओमेश साहेबराव जपे पा. यांचा आज बुधवार 13 मार्च 2023 रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहेत.
त्याचप्रमाणे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीपराव सदाफळ यांचाही आज 13 मार्च रोजी वाढदिवस असून त्यांच्यावरही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनाही दैनिक छत्रपती एक्सप्रेस परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहेत.
0 Comments