[औषधांचा कचरा झाडांच्या खोडाला
जाळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप]
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर पंचायत समितीच्या आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या चणेगाव येथील उपकेंद्रा मार्फत गावपातळीवरील सर्वसामान्यांना प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेले असताना हे उपकेंद्रच आता सलाईनवर आल्याने येथील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४ गावे येतात त्यातील अनेक गावांत उपकेंद्र आहे मात्र या उपकेंद्रला प्राथमिक आरोग्य अधिकारी खूप अल्प वेळ देतात त्याच प्रमाणे येथील परिचारिका वेळेस हजर नसतात ह्या उपकेंद्राच्या आवारातील झाडांच्या खोडाला औषधांचा कचरा जाळल्याने तेथील झाडे जळाले आहेत तसेच पाण्याच्या टाकीत मृत मांजरे पडलेले असुन रुग्णांच्या शैचालायाची दुरावस्था झाली आहे या उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचा संदेश देणारे हे उपकेंद्रच आता घाणीचे आगार बनत आहे येथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या साधना अभावी इथे येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.अतिशय सघर्षातुन आणि पाठपुराव्यातुन हे उपकेंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने येथे उभे केले आहेत.परंतु आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि परिचारिकांच्या अल्प सेवेमुळे येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
[जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका अधिकारी यांनी यांनी चणेगाव उपकेंद्र दुरावस्थेबाबत निर्णायक पावले उचलत या उपकेंद्राच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करावी आणि हे उपकेंद्र पर्ववत व्हावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अण्णा लोहाळे यांनी केली आहे]
0 Comments