सावळीविहीर व परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी!

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील 
सावळीविहीर व परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रात्री बारा वाजता सावळीविहीर गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुष्पहार अर्पण करून वंदना घेत, एकच साहेब, बाबासाहेब !! तसेच जय भीम चा नारा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी रात्री फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
त्यानंतर रविवार 14 एप्रिल रोजी सकाळी सावळीविहीर समस्त ग्रामस्थांच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करत अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या‌ परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य ,सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य सर्व संघटनांचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते ,सदस्य ग्रामस्थ महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सावळीविहीर परिसरातही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 जयंती निमित्ताने सावळीविहीर बुद्रुक येथील  सोमैय्यानगर येथे जी बी बॉईज तसेच भीम जयंती उत्सव समिती व संघमित्रा बुद्ध विहार कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना  पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
आजी-माजी सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
त्याचप्रमाणे येथील सिद्धार्थ नगर मध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व परिसरात सुशोभीकरण करण्यात आले असून येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करण्यात आला. अनेक ठिकाणी भीम गितांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. सिद्धार्थ नगर येथे सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्ताने 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे .त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक सहा वाजता भव्य लाईट शो व स्टॅंडिंग सवाद्य सवाद्य कार्यक्रम होणार आहे. रक्तदान शिबिर व सर्व कार्यक्रमाला भीमसैनिकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सावळीविहीरवाडी, लक्ष्मीवाडी, तसेच परिसरातील सावळीविहीर खुर्द येथेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ग्रामस्थ , आंबेडकर प्रेमी यांनी अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी केली.
या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला तरुण उपस्थित होते. दिवसभर ठिकठिकाणी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम होत होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे