शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशनवर संस्थांनचे माहिती व सुविधा केंद्र व लाडू विक्री केंद्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या हस्ते उद्घाटन!

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साई संस्थान च्या वतीने श्री राम नवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन येथे साई भक्तांसाठी विविध सोयी सुविधांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
 आज दि. १६ एप्रिल २०२४ रोजी श्री रामनवमी उत्‍सवाचे प्रथम दिवशीच्या औचित्‍यावर शिर्डी साईनगर रेल्‍वे स्‍टेशन येथे साईभक्‍तांचे सुविधे साठी श्री साईबाबा संस्‍थानचे माहिती व सुविधा केंद्र व लाडु विक्री केंद्राचे उदघाटन साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,  विद्युत विभाग प्रमुख किशोर गवळी, माहिती तंत्रज्ञान प्रमुख राहुल गलांडे, अनिल शिंदे  आ‍दी उपस्थित होते.
साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन हे साई भक्तांच्या दृष्टीने मोठे व महत्त्वाचे स्टेशन असून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातून, परराज्यातून साई भक्तांसाठी हे रेल्वे स्टेशन मोठे उपयोगी ठरत आहे. रेल्वेने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येत असतात. साई दर्शनानंतर परत जात असतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर साई संस्थांनच्या वतीने माहिती केंद्र तसेच श्री साईबाबांचा लाडू प्रसाद पाकीट विक्री केंद्र असावे. अशी साई भक्तांची इच्छा होती व ती साई संस्थांनच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून आज मंगळवारी या साई संस्थांनच्या माहिती व सुविधा केंद्र व लाडू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे साई भक्तांमधून व रेल्वे प्रवाशांमधूनही मोठे समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे