आई-वडिलांची सेवा करत नाही त्याला संस्कृत हिनता असे म्हणतात.... महंत रामगिरीजी महाराज

लोहगाव( वार्ताहार )
शिकलेले मुलेच आई-वडिलांची सेवा करत नाही त्याला संस्कृती हिनता असे म्हणतात परंतु आपली भारतीय संस्कृती अशी नाही. मातृदेवो भव. पितृदेवो भव .आचार्य देवो भव.माता पित्याची सेवा करण्याची आपली संस्कृती आहे असा उपदेश महंत रामगिरीजी महाराज यांनी भाविकांना केला.
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल वर्धापन दिनानिमित्त श्री साई सच्चरित् पारायण सोहळ्याच्या सांगता काल्याच्या कीर्तन सेवे प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते.
संस्कृत हिंनता ही शहरात जास्त प्रमाणात आहे. त्याचा लोन आता खेड्यातही देखील  वाढायला लागलेला आहे .मुलांना बाल वयात संस्कृतीचे ज्ञान हवे आहे. सौदी आरेबियात तसेच  मुस्लिम समाज्यात देखील रामायण महाभारतचे धडे शिकवले जातात मुलांना आज चांगल्या संस्काराची गरज आहे. तरच ते आई-वडिलांची सेवा करतील तेच कार्य साई सद्गुरु गुरुकुलाच्या माध्यमातून चालू आहे असे गौरव उद्गार महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले याप्रसंगी साई सद्गुरू गंगागिरी गुरुकुलचे संपादक संदीप महाराज चेचरे यांनी रामगिरी  महाराजांचा यांचा सत्कार केला. .यावेळी उपस्थित मधुकर महाराज कडलग. रामभाऊ महाराज. विजुभाऊ कोते. ज्ञानदेव महाराज वाबळे . दादासाहेब जमधडे .प्रल्हाद मामा काकडे .रवी महाराज चेचरे.  कैलास भाऊ चेचरे. योगेश देशपांडे .संतोष पवार. शिवनाथ पवार. हर्षद ताजने. बाबा मगर. रावसाहेब वेताळ .मायराज अनर्थे. माधव मिजगुले. कुबेर जगधने .अमोल जगधने .बाळासाहेब चेचरे आप्पासाहेब चेचरे. लक्ष्मण शेलार. विलास डोखे. भास्कर थेटे .यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाल्यामुळे महाराजांनी त्यांना धन्यवाद दिले.
गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष रामायणाचार्य ह. भ .प संदीप महाराज चेचरे यांच्या वाढदिवसानिमित्त रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. उपस्थित भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!