श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट २०२४ सत्राकरीता प्रवेश सुरु!


शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी या संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट - २०२४ सत्राकरीता प्रवेश देणे सुरु आहे. या संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ११ व्‍यवसायांच्‍या २२ व्‍यवसाय तुकडयामध्‍ये प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्‍ट - २०२४ सत्राकरीता प्रवेश क्षमता ३०४ इतकी आहे. सन १९८४ साली संस्‍थेची स्‍थापना झालेली आहे.या संस्‍थेमधील सर्व व्‍यवसायांना डीजीटी, नवी दिल्‍ली यांची कायमस्‍वरुपी संलग्‍नता आहे.सर्व व्‍यवसायांमध्‍ये अत्‍याधुनिक मशिनरीवर अभ्‍यास क्रमानुसार १००% प्रशिक्षण दिले जाते. याकामी असणारे सर्व प्रशिक्षक हे अनुभवी व उच्‍च विद्याविभूषित आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ही संस्‍थेतील १००% प्रवेश क्षमतेच्‍या जागांवर महाराष्‍ट्र शासनाच्‍या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने Online  गुणवत्‍तेनूसार भरल्‍या जातात याकामी अत्‍यंत माफक शासनाच्‍या नियमानुसार प्रशिक्षण शुल्‍क आकारले जाते.
या संस्‍थेची उत्‍कृष्‍ठ निकालाची परंपरा असुन संस्‍थेमधील सात प्रशिक्षणार्थी आजपर्यंत देशात प्रथम आलेले आहेत व २३ प्रशिक्षणार्थी राज्‍यात प्रथम आलेले आहेत.संस्‍थेला केंद्र शासनाच्‍या सात वेळा वेगवेगळया ट्रेडमध्‍ये सर्वोत्‍कृष्‍ट संस्‍था पुरस्‍कार मिळालेले आहेत. प्रशिक्षण पुर्ण होण्‍याच्‍या अगोदरच संस्‍थेतील प्रशिक्षणार्थ्‍याची वेगवेगळया नामांकित कंपन्‍यामध्‍ये Campus Interview चे आयोजन करुन शिकाऊ ऊमेदवारी / नोकरीसाठी निवड केली जाते.महाराष्‍ट्र शासनाच्‍या तसेच केंद्र शासनाच्‍या वेगवेगळया शिष्‍यवृत्‍ती योजनांचा लाभ संस्‍थेतील प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्‍यांना मिळण्‍यासाठी संस्‍थेकडुन मार्गदर्शन केले जाते. यांचा लाभ संस्‍थेतील बहुतांश प्रशिक्षणार्थ्‍यांना होतो.सन २०२२-२०२३ मध्‍ये जर्मन व जपान देशात डयुएल डिग्री अभ्‍यासक्रम व नोकरीकरीता या संस्‍थेच्‍या १३ प्रशिक्षणार्थ्‍यांची निवड झालेली आहे.
या सत्राकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सुरु झालेली असुन दि.३० जून २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. याकामी श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करणेत आलेले आहे.सर्व व्‍यवसायांसाठी १० वी उत्‍तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. तरी जास्‍तीत जास्‍त विदयार्थ्‍यानी प्रवेश अर्ज भरुन ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री गोरक्ष गाडीलकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी (फोन नं.०२४२३ २५८८५८) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहान करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे