चला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करू;वरवंडीच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत



संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वरवंडी नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वर्पे, उपाध्यक्षा सौ.कविता भोसले, सदस्या जया पोपळघट, रेवणनाथ वर्पे, मच्छिंद्र भोसले, सागर पोपळघट,निलम कुलकर्णी, बापू गागरे, संतोष वर्पे,अनिता वर्पे तसेच पालक उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.अध्यक्ष भाऊसाहेब वर्पे यांकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!