माळवाडी (प्रतिनिधी) माळवाडी ता. बारामती येथे डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय बारामती (शारदानगर) येथील कृषिकन्यांचे आगमन झाले आहे.
त्या माळवाडी येथे वास्तव्य करून शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.त्याच बरोबर विविध शेतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहे.
त्याच अंतर्गत त्यांनी गावामध्ये स्वागत समारंभाचे आयोजन केले . त्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांना रोपे देऊन त्यांना पुढील प्रात्यक्षिकांना प्रतिसादासाठी आवाहन केले . कृषिकन्या प्रगती पवार , तनया काटकर , जानवी मुसळे , अनुजा गवळी , साक्षी जाधव , सिद्धी पुंडे आणि ईशा हिरणावळे यांनी सरपंच सौ. उज्वला खलाटे ,उपसरपंच सौ. नंदा सोनवणे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील सौ. कोयल बनकर तसेच सर्व ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले. त्या सर्वांनी कृषीकन्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही बुरुंगले यांचे मार्गदर्शन या कृषिकन्यांना होत आहे
0 Comments