आश्वी(प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे दोन महीन्यापुर्वी विश्वहिंदू परिषद बजरंग दलाची स्थापना झाल्यानंतर कत्तलीसाठी जानाऱ्या गोऱ्हांना शेतकऱ्यानां आव्हान करून गोळा केले जात आहे. परीसरातील शेतकऱ्यांना आव्हान केल्यापासुन आज पर्यत ७० हून अधिक गोऱ्हानां कत्तली ऐवजी संगमनेर येथील पाझरपोळ गोशाळा येथे पाळण्यासाठी देण्यात येत असल्याची माहीती आश्वी खुर्द बजरंग दलाचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी दिली.
गेली दोन महीन्यापासुन बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते प्रत्यक शेतकऱ्याच्यां गोठयावर जाऊन तेथील परिवांराचे प्रबोधन करत जन्मलेले वासरे गोळा करत युगांतर मंडळाच्या गोडावुन मध्ये ठेवत त्यांच्या दुधाची चाऱ्याची व्यवस्था स्वत करत व जास्त प्रमाणात वासरे जमा झाल्यावर हि वासरे गोशाळेकडे सुपुर्त करत असुन त्यांच्या या कार्याचे आश्वी परिसरात कौतुक होत आहे.
पैदाशीचे वळू आणि रेडे राज्यातून नाहीसे झाले आहेत. जातिवंत वळू किंवा रेडा शाश्वत यंत्रणेकडून मिळत नाही आणि जन्मणारी पिढी उत्पादकतेच्या दृष्टीने "शाश्वत' होत नाही, ही गंभीर परिस्थिती गेल्या दहा वर्षांपासून अधिक गंभीर होत आहे. गोऱ्हा किंवा हेल्या चीक न पाजता मारून टाकणारी मानसिकता पशुपालकांकडून दूध घटविण्यास कारणीभूत ठरली आहे. असे मत यावेळी अश्विन खुर्द चे बजरंग दलाचे उमेश सालकर यांनी व्यक्त केले.
0 Comments