माळवाडी ( बारामती) छत्रपती एक्सप्रेस प्रतिनिधी,
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालयातील कृषीकन्यांनी गावामध्ये माती परिक्षण प्रात्यकक्षिकाचे आयोजन केले होते.शेतकऱ्यांमध्ये पेरणीपूर्वी त्यांच्या मातीचा पोत कळवा यासाठी त्यांनी माती परीक्षण केले जाते. मातीच्या अन्नद्रव्याचे प्रमाण तपासून खतांच्या मात्रा देणे नेहमीच फायदेशीर असते. माती तपासणीसाठी प्रातिनिधिक नमुना घेणे महत्त्वाचे असते .त्यासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा आणि त्यामध्ये घ्यावयाची काळजी या बद्दल सविस्तर माहिती कृषीकन्या मार्फत देण्यात दिली . तसेच माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिकन्या अनुजा गवळी , जानवी मुसळे , तनया काटकर , साक्षी जाधव , ईशा हिरणावळे , सिद्धी पुंडे आणि प्रगती पवार यांनी केले.
या प्रात्यक्षिकासाठी गावचे माजी उपसरपंच श्री विशाल दानवले व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते . या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाचे समन्वयक एस.पी. गायकवाड , एस. व्ही. बुरुंगले आणि एस. सी. वाघ यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
0 Comments