एकच मिशन -जुनी पेन्शन साठी आज 15 सप्टेंबरला कोपरगाव येथे राज्यस्तरीय जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने भव्य अधिवेशन!

कोपरगाव( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने'च्या वतीने रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव बेट येथे  राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 'एकच मिशन जुनी पेन्शन' आणि 'वोट फॉर ओपीएस' असा निर्धार करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यभरातील पेन्शन धारक व सरकारी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती, महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
 कोपरगाव येथील जनार्धन स्वामी  महाराज समाधी मंदिराजवळील मैदानावर भव्य मंडपात रविवार 15 सप्टेंबर रोजी जुनी पेन्शन संघटनेचं खुलं अधिवेशन भरत आहे. या अधिवेशनाला विविध पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. अधिवेशनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली.
या अधिवेशनात राज्यातील संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू करण्यात यावी, ही प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. 2005 नंतरच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अनेक नव-नवीन पेन्शन योजनेची आमिषं दाखवली. मात्र, ही फक्त आमिषच राहिली असल्यानं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने या विरोधात तीव्र असा लढा उभा केला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी शासन दरबारी गेली अनेक वर्ष मागणी लावून धरली आहे. तर शासनाने देखील आता कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या रोषाला शासनाला सामोरे जावं लागेल. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन लागू करावी. अशी मागणी या अधिवेशनात एकमुखी ठराव करून करण्यात येणार आहे. अन्यथा त्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे