राहता (प्रतिनिधी) हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम असे म्हटले जाते. म्हणजे जगामध्ये सर्वजण एका कुटुंबातील आहेत. सर्व एका कुटुंबातील आहेत तर मग प्रत्येकाशी समान व्यवहार केला गेला पाहिजे. त्यासाठी समान नागरी कायदा हे एक अध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून समानतेचा विचार हा महत्त्वाचा असल्याचे मत श्री नर्मदेश्वर आश्रमाचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी दैनिक छत्रपतीला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम असे म्हटले जाते. म्हणजे सर्व दुनिया एका परिवारातील सदस्य आहेत. मग एका परीवारातील सदस्य असल्यामुळे सर्वांना समान वागणूक देणे गरजेचे आहे व त्यासाठी समान नागरी कायदा अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून सामाजिक समानता व न्यायिक व्यवस्थेसाठी ही तो महत्त्वाचा ठरणार आहे. देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी ते एक सशक्त असे माध्यम ठरणार आहे. धार्मिकता आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वांना एकाच ईश्वराची लेकरे पाहण्यासाठी या कायद्याचा विचार महत्त्वाचा असून सर्व जाती धर्म पंथ हे एका परिवाराचे सदस्य झाल्यासारखे होतील. सर्वांना समान अधिकार मिळवून एकमेकांना कोणी श्रीमंत वा गरीब ,उंच वा नीच असा भेदभाव राहणार नाही .सर्वजण एकमेकाचे कुटुंबातील सदस्य म्हणून चांगले जीवन जगतील. असा यातून एक प्रयत्न होईल. असे आपले वैयक्तिक मत आहे व त्या साठी आपला या समान नागरी कायदाला अध्यात्मिक दृष्टिने समर्थन असल्याचेही नर्मदेश्वर आश्रमाचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments