येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र अंदरसुल येथे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर )यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रत शुद्धी दिन (जयंती) तसेच वै. ह भ प सुभाष( गुरु )महाराज पाठक, अंदरसुलकर यांचे चतुर्थ पुण्यस्मरण या निमित्ताने अंदरसुल येथील श्री विठ्ठल मंदिर येथे गुरुवार 26 सप्टेंबर ते रविवार 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सव व विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र अंदरसुल हे येवला तालुक्यातील येवला- वैजापूर या महामार्गा लगत असणारे अध्यात्मिक व धार्मिक असे गाव असून येथे गेल्या चार वर्षापासून वैकुंठवासी ह भ प सुभाष गुरु महाराज पाठक, अंदरसुलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षीही अंदरसुल येथील श्री विठ्ठल मंदिरात हा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती म्हणून श्रीक्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज
ह भ प पुष्करजी महाराज गोसावी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यानिमित्त दररोज पहाटे पाच वाजता ह भ प श्रीराम बाबा महाराज देशमुख ,ह भ प भगवान आप्पा सुराडे ,ह भ प लाला मामा सोनवणे, ह भ प केशव महाराज भवर, ह भ प गोकुळ मामा पैठणकर ,यांच्या नेतृत्वाखाली काकडा आरती, सकाळी आठ ते दहा दरम्यान विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा, दुपारी तीन ते पाच प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा या कालावधीत श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगावबल्ले, तालुका येवला यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ आणि रात्री किर्तन सेवा होणार आहे. दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत ह भ प राहुलजी महाराज क्षिरसागर ,पिंपळगाव बसवंत यांचे प्रवचन होणार असून रात्री आठ ते दहा या कालावधीत ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांचे परम शिष्य व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प गुरुवर्य महंत संजयजी महाराज जगताप, भऊरकर यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत हभप समाधानजी महाराज पाटील ,वंजारवाडीकर यांचे प्रवचन व रात्री आठ ते दहा या वेळेत ह भ प प्राध्यापक गुरुवर्य अनिलजी महाराज दातार, निफाड यांचे कीर्तन होणार आहे. तसेच शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी हभप अमोलजी महाराज पल्ले, लातूर यांचे दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवचन व रात्री आठ ते दहा या वेळेत लातूर येथील हभप
भूषणजी महाराज तळणीकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत वेदशास्त्र संपन्न ह भ प गुरुवर्य जगदीशजी शास्त्री (जोशी महाराज )त्रिंबकेश्वर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होणार आहे. व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.या धार्मिक कार्यक्रम सोहळ्यासाठी गायनाचार्य म्हणून ह भ प अमोल महाराज पल्ले लातूर, तसेच खरवंडी येथील ह भ प दत्तू महाराज आहेर व पिंपळगाव बसवंत येथील ह भ प राहुल महाराज शिरसागर हे राहणार असून मृदंगाचार्य म्हणून इगतपुरी येथील हभप स्वामी महाराज गोवर्धने हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी अंदरसुल व परिसरातील गावातील, सर्व भजनी मंडळे, वारकरी ,भाविक यांचे सहकार्य राहणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा . असे आवाहन समस्त पाठक परिवार व समस्त ग्रामस्थ अंदरसुल,तालुका येवला यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments