निरंतर वाचनाची सृजनशीलतेला जोड द्या-प्रा.जयप्रकाश कलवले


राष्ट्रीय ग्रंथालय दिवस उत्साहात साजरा

पुणे (विशेष प्रतिनिधी) विद्यार्थ्यानी सृजनशीलतेला वाचणाची जोड देत वाचनाची आवड जोपसावी कारण वाचनाने विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होतो कुठलेही ग्रंथ वाचताना पुर्वग्रह दुषितपणा टाळावा आणि निरंतर वाचन करावे असे आवाहन प्राचार्य प्रा‌.जयप्रकाश कलवले यांनी पुणे येथे केले. 
पुणे येथील डॉ.डी .वाय.पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस् आणि क्राफ्ट्स् आकुर्डी, पुणे व डी. वाय. पाटील इंटरनॅशनल  विद्यापीठ यांच्या संयुक्त विधमाने भारतीय ग्रंथालयाचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या १३२ व्या जंयती निमित्याने राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला प्रसंगी पुस्तक समीक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या उपयोजित स्पर्धेत कलेतील चारही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात भाग घेतला होता वाचन संस्कृती जोपाण्याचे वचन यावेळी विद्यार्थ्यांनी दिले. 
प्रसंगी डॉ नितीन तावरे डॉ राहुल वेलदोडे, प्रा पल्लवी पांढरे ,यांनी आपले विचार मांडले तर  डॉ.सरिता स्थुल,आर अभिजित  मारावार  हे परीक्षक होते .विध्यार्थ्यांच्या  उत्फुर्त सहभागाचे व कार्यक्रमाच्या नियोजनाचे परीक्षकांनी कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका कुंजीर यांनी केले तर प्रा शंकर आडेराव ,प्रा समता बेंद्रे ,प्रा.शरद वडकर,प्रा. कृष्णा  सावंत, प्रा.इंद्रजित बंगाळे , प्रा .श्याम पगारे , प्रा राजेश पुजारी, प्रा.फाल्गुनी मारबते , प्रा विजया लक्ष्मी एम. एल. जगदाळे,अमेंद्र देशमुख ,स्नेहा मगरे  यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या समन्वयक ग्रंथपाल  सौ.दर्शना गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे