वरवंडीच्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा



संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती व गावातील नागरिकांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बस्ते यांनी भुषविले प्रसंगी अध्यक्षांनी मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे,अर्जुन दातीर, सुवर्णा गायकवाड, विकास वर्पे या सर्व शिक्षकांचा पेन व पुष्प देऊन सन्मान केला यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक उल्हास गागरे कैलास बबन वर्पे , सुभाष गागरे बापू गागरे , संतोष वर्पे ,अशोक पाटोळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे