शिर्डी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन विविध कार्यक्रमाने व मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बनलेली विद्यार्थिनी कु. स्नेहल गणेश वाळुंज ही होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, सरपंच ओमेश जपे ,उपसरपंच विकास जपे, कैलास सदाफळ,राजेंद्र आगलावे, सागर आरणे, राजेंद्र गडकरी, चंद्रकांत जपे, बाबासाहेब कापसे, मुख्याध्यापक एस एम तुपे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मान्यवरांचा व या दिवशी शिक्षक म्हणून काम केलेल्या कु.स्नेहल वाळुंज ,रूपाली पठारे, कशिश चंदनशिव, तनुजा विघे, समृद्धी सोळसे ,चैताली पवार, अनुजा पवार ,आम्रपाली वाघमारे, सिमरन वाघमारे ,पुनम कुसाळकर, अवंतिका जमधडे, तनुश्री जाधव, भक्ती तुरकणे, साक्षी तुपशेंद्रे, ईश्वरी सोळसे, अवधूत निलेश आरणे, आदित्य आरणे, निशांत जाधव, नितीन अहिरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी नेहमीच आदर सन्मान राखला पाहिजे, शिक्षक एक गुरुच असतात. असे सांगितले तर बाळासाहेब जपे यांनी समाज घडवण्याचे काम शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून शिक्षक दिनाला खूप महत्त्व आहे. असे सांगून त्यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक तुपे एस. एम.
ज्येष्ठ शिक्षक डुंबरे आर. ए.
म्हस्के ए.जे. काळेगोरे एम.बी,खेडकर बी.आर,खान आय.आय,श्रीम. कानडे एम.पी.
सौ. भामरे एम.आर,वाकचौरे ए.ए. व श्रीम. शिंदे एम.डी. आदी शिक्षकांसह ,विद्यार्थी ,शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते. डुंबरे सरांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments