महाविकास आघाडीचं सरकार फक्त फेसबुक वर होतं, मात्र महायुती सरकारनं प्रत्यक्षात करून दाखवलं--ना. राधाकृष्ण विखे पा.

शिर्डी (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीचे, ठाकरेंचं सरकार   अडीच वर्ष होत, पण ते फक्त फेसबुक वर होतं. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्यांमध्ये विविध योजना राबवून विकास करण्याचे ध्येय ठेवून सरकारने जनतेला विकासाचे सरकार हे महायुतीचेच सरकार असल्याचं प्रत्यक्षात दाखवून दिलं, महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या विधानसभेत आम्ही योजनांसाठी खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले. मात्र खटाखट पैसे सोडाच त्यांनी काहीच केले नाही. मात्र महायुतीच्या सरकारने तरी योजनांसाठी पटापट पैसे दिले . अनेक योजना अंमलात आणून त्या राबवल्या. असे प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ हॉटेल साई संगम येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळावा मध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी संदीप सोनवणे, निलेश मुकुंदराव कोते, रमेश गोंदकर, आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नामदार विखे ‌पा.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिर्डी शहराचा झपाट्याने विकास होत आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे आणखी विकास व योजना येथे राबवणे महत्त्वाचे आहे. विरोधक नुसत्या गप्पा मारतात. मात्र केंद्रात राज्यातही महायुती सरकार प्रत्यक्षात योजना राबवून विकास करते .असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संदीप सोनवणे म्हणाले की, साहेब, आम्ही कायम  तुमच्या सोबत आहोत. सामान्य वर्गाकडे आपण यापुढे लक्ष द्या. सामान्य माणूस हा आपला आहे. असे भावनात्मक आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी निलेश कोते व कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे