पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राने देशात व राज्यात विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारची राज्यात गरज असून महायुती आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी
केले.
महायुतीचे शिर्डीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिर्डीत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. जेपी नड्डा पुढे म्हणाले की, देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान मोठे असून त्यासाठी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. राज्याचा विकास होण्याबरोबरच शिर्डीचाही विकास व्हावा .यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य शासनाने देशात व राज्यात विविध योजना आणल्या, मोफत धान्य योजना, पंतप्रधान सन्मान योजना, घरकुल योजना,आदी विविध योजना अंमलात आणून विकासासाठी सरकारचा प्रयत्न अहोरात्र सुरू आहे .मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतही पंधराशे वरून 2100 रुपये करण्यात येईल .असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शिर्डी येथील विमानतळास 590 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येथे मोठा विकास केला. त्याचप्रमाणे निळवंडे धरण, ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्याबाई स्मारक, एमआयडीसी आदी विविध विकासाच्या दृष्टीने योजना आणल्या. त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांना आमची नेहमीच साथ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहान त्यांनी यावेळी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी मतदार महिला युवक उपस्थित होते.
0 Comments