शिर्डी (राजकुमार गडकरी) राज्यामध्ये चार-पाच दिवसात सरकार स्थापन होईल. चार-पाच दिवस गेले तर काही फरक पडत नाही. मात्र राज्याला स्थिर ,शाश्वत, मजबूत असं सरकार स्थापन होणे गरजेचे आहे व ते योग्य वेळी होईल. असं मत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
राहुल नार्वेकर यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , विरोधक बोलतात की सरकार स्थापन व्हायला बरेच दिवस लागलेत, मात्र शरद पवार यांच्या काळात सन 2004 मध्ये सरकार स्थापन होण्याला बरेच दिवस लागले नव्हते का ?असा सवाल करत चार-पाच दिवस गेले तर काही फरक पडत नाही. मात्र राज्याला स्थिर शाश्वत मजबूत असं सरकार स्थापन होणं महत्त्वाचं आहे .त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन योग्य वेळी असं मजबूत सरकार राज्यात लवकरच स्थापन होईल असं सांगत विरोधकांकडून ईव्हीएम मशीन बद्दल खोटं बोलून रडीचा डाव ते खेळत आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या रडीच्या डावावर जनता विश्वास ठेवत नाही. लोकसभेत ईव्हीएमचाच वापर केला गेला .ईव्हीएम मशीनच्या प्रोसेस मधूनच लोकसभेच्या निवडणुकीत घेतल्या गेल्या. त्यावेळी निवडणूक आयोगाचे विरोधकांनी कौतुक केले होते. मात्र विधानसभेत हार झाल्यानंतर रडीचा खेळ ते खेळत आहेत . जितेंद्र आव्हाड ईव्हीएम मशीन वर आरोप करत असतील तर खासदार सुप्रिया सुळे ह्या लोकसभेत निवडून आल्या , त्यावेळीही ईव्हीएम मशीनच होते . त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा व बॅलेट पेपरवर परत निवडणूक घेण्याची मागणी करावी. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.आपल्या इच्छा विरोधात कोणती घटना झाली की विरोधकां कडे फक्त टीका करण्याचे काम असते. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालय, लोकसभा ,विधानसभेचे स्पीकर तसेच निवडणूक आयोग यांच्यावरही यापूर्वी टीका केली आहे. संविधानिक संस्थेवर विरोधकांचा विश्वास नाही. याचा अर्थ संविधानावर त्यांचा काय विश्वास राहणार?, व संविधानाचा काय आदर करणार! असे सांगत संविधानिक संस्थांना दोषी ठरवण्याचे काम ते हार झाल्यामुळे करत आहेत. मात्र जनता सुज्ञ असून या त्यांच्या रडीच्या डावावर विश्वास ठेवायला तयार नाही .असे सांगत उबाठा पक्षामध्ये विष पेरायचे काम संजय राऊत यांनी केले आहे. हे उबाठा पक्षा मधल्या जुन्या जाणकारांना माहिती आहे.आता द्राक्षे आंबट लागतात, अशी परिस्थिती विरोधकांची झाली आहे. विधानसभेत हार झाल्यामुळे कारण नसताना दुसऱ्यांवर आरोप, दोष ठेवायचे ,व असा संजय राऊत यांचा नेहमीचाच जुना प्रकार आहे. हे आता उबाठा शिवसेना पक्षाने ओळखले पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments