राहाता शहराचा विकास व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठा बदल झपाट्याने घडून आणला, तसाच शिर्डी विधानसभा मतदारसंघातही बद्दल घडवण्यासाठी डॉक्टर राजेंद्र पिंपाडा यांना निवडून द्यावे , असे आवाहन राहत्याच्या मा. नगराध्यक्षा ममताभाभी पिपाडा यांनी केले.
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथे बुधवारी सकाळी ममता पिपाडा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली. ममता पिपाडा व कार्यकर्त्यांनी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या समर्थनार्थ श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन, तसेच छत्रपती स्मारकाचे दर्शन घेऊन गावातून प्रचार फेरी मारली. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. घरोघर जाऊन पत्रिका दिल्या व माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत महिला मोठ्या प्रमाणात होत्या. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणे हा आमचा हक्क आहे व मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत , राहता शहराचा तीस वर्षात जेवढा बदल झाला नाही तेवढा बदल मी दहा वर्षात तेथे करून दाखवला. त्याचप्रमाणे शिर्डी मतदारसंघातही मोठा बदल व विकास करायचा आहे. त्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत उभे असणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिंपाडा यांच्या रिक्षा चिन्हावर शिक्का मारून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहान यावेळी ममता (भाभी) पिपाडा यांनी केले.
0 Comments