भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे शिर्डीत जोरदार स्वागत! स्वागत कमानी ,रॅली रांगोळ्या ,घोषणा!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीत जे.पी. नड्डा यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. शिर्डी शहरात बुधवारी ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री ना. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली. नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटारसायकल रॅलीने संपूर्ण शहराचा उत्साही माहोल निर्माण केला. सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा रॅलीमध्ये लागल्या होत्या.
जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटारसायकल रॅली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. रॅलीच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. तर रस्त्याच्या कडेला नागरिकांची गर्दी दिसत होती .कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित केला होता.
हि रॅली शिर्डीत पोहोचताच ग्रामस्थांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत जोरदार पुष्पवृष्टीत केले. महिला भगिनींनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत, फुलांच्या वर्षावात औक्षण करत आदरपूर्वक स्वागत केले.  “राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी परिसराचा विकास वेगाने झाला आहे. त्यांनी शेतकरी, महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे आज त्यांना समाजाकडून आदर मिळत आहे. जेपी नंड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे म्हणून आम्ही त्यांचे जोरदार स्वागत करत आहोत. असे कार्यकर्त् व उपस्थित महिलांकडून बोलले जात होते.
सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केले. महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागाने महायुतीच्या प्रचारामध्ये अभूतपूर्व ऊर्जा पाहायला मिळाली. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कमळ असणाऱ्या टोप्या, कमळ असणारे गळ्यात मफलरी व घोषणांमुळे सर्व परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे