दरवर्षी येणारा एक जून हा वाढदिवसांचा जणू एक मोठा उत्सव!

शिर्डी (प्रतिनिधी) आज रविवार 
१ जून—ही फक्त एक तारीख नाही, तर महाराष्ट्राचा “वाढदिवसांचा जणू एक उत्सव” आहे! कारण आज अनेकांचा वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी तो मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होत आहे.तो खरा असो किंवा खोटा असो. पण वाढदिवस आहे. कारण अनेकांच्या शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख एक जून आहे. पूर्वी पहिल्या वर्गात प्रवेश देताना अनेकांना जन्मतारीख माहीत नसल्यामुळे व शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असल्यामुळे गुरुजी अंदाजे एक जून ही जन्मतारीख शाळेत नाव टाकताना दाखल्यावर टाकून शाळेत प्रवेश देत होते. असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांची खरोखर जन्मतारीख वेगळी आहे. परंतु दाखल्यावर एक जुन जन्मतारीख आहे. त्यामुळे शाळेची दाखल्यावरती जी जन्मतारीख आहे तीच खरी जन्मतारीख गृहीत धरली जाते. सेवानिवृत्त होतानाही हीच जन्मतारीख गृहीत धरली जाते. तुमच्या आधार कार्डवर ही जन्मतारीख येते. त्यामुळे एक जून ही जन्मतारीख खरी असो किंवा खोटी असो, वाढदिवस मात्र नक्कीच असतो. कारण तीच खरी जन्मतारीख म्हणून वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. त्यामुळे एक जून या दिवशी अनेकांचा वाढदिवस असल्याचे दिसून येते.ते काहीही असो  मात्र एक जून ही गुरुजींमुळे म्हणा किंवा खरोखर जन्मलेली तारीख म्हणा , आपला हा वाढदिवस साजरा करत असताना  तुमच्या आयुष्याचा हा नवीन अध्याय, आनंद, यश, आणि धमाल मस्तीने भरलेला असू दे. तुम्हा सर्वांना एकच मंत्र चमकत राहा, झगमगत राहा, जीवनात समाधानी जगत रहा, आनंदी राहा,  ज्यांचा ज्यांचा आज खरा किंवा खोटा वाढदिवस आहे. त्या सर्वांनाच वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! जुग जुग जिओ हजारो साल! साल के दिन हो पचास हजार!

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!