लोणी (प्रतिनिधी) काल दि.६ सष्टेबर सायंकाळी सुरु झालेल्या ढगफुटी पर्जन्यवृष्टीमुळे अनेक नागरिकांची त्रेधातिरपीठ उडाली तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने अनेक कुंटुबे बेघर झाली तसेच लोणी खुर्द गावात झालेल्या या दमदार पावसामुळे तळेगाव रस्त्याच्या लगत असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे तेथील १५ ते २० कुटुंब बेघर झाले या सर्व गोष्टींची दखल घेत स्थानिक आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तसेच दुग्ध विकास
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पिडीत कुटुंबीयांची जो पर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही तो पर्यंत त्यांना तिन्हीं वेळेचे जेवण व रात्री राहण्याची व्यवस्था केली.सदरचे नियोजन जनसेवा मंडळाच्या वतीने तसेच लोणी खुर्द जनसेवा मंडळाचे कार्यकर्त्यांच्या अनमोल सहकार्याने करण्यात आले.
0 Comments