प्राध्यापक डॉ.कपिल चौरपगार यांची विधी अभ्यास मंडळावर नियुक्ती



संगमनेर (प्रतिनिधी) शहरातील ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कपिल चौरपगार यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील सामाजिक शास्त्रे विद्या शाखे अंतर्गत विधी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या समितीवर नुकतीच नियुक्ती झाली. डॉ. कपिल चौरपगार मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये संशोधक मार्गदर्शक असून ते वकील,शिक्षक आणि न्यायाधीश यांना मार्गदर्शन करत आहेत.त्यांच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ अनिल राठी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!